Saturday, March 21, 2026

Latest Posts

लग्नात बाधा नको म्हणून प्रियसीचा गळा आवळून  खून; मृतदेह आंबा घाटात टाकला

रत्नागिरी: ठरलेल्या लग्नात बाधा येऊ नये यासाठी आधीच्या प्रियसीचा काटा काढल्याचा खळबळजनक प्रकार रत्नागिरी घडला आहे. रत्नागिरी मिरजोळे  येथील तरुणीचा वायरने गळा आवळून तिच्या प्रियकराने खून केला असून मृतदेह आंबा घाटात नेऊन दरीत टाकल्याचे तब्बल १४ दिवसांनी शनिवारी दि ३० ऑगस्टला उघड झाले आहे. भक्ती जितेंद्र मयेकर असे यातील  मृत तरुणीचे नाव असून  याप्रकरणी दुर्वास दर्शन पाटील (रा. खंडाळा) याला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील भक्ति जितेंद्र मयेकर (रा. नाखरेकरवाडी , मिरजोळे) १६ ऑगस्टला मिरजोळे  येथील आपल्या घरातून बाहेर पडली. रत्नागिरीतील प्रशांत नगर येथील घरी जाते असे तिने घरी सांगितले होते. १७ ऑगस्ट पासून तिचा फोन बंद येत होता त्यामुळे तिचा भाऊ हेमंत जितेंद्र मयेकर याने  तिच्या मित्र-मैत्रिणींकडे  चौकशी सुरू केली मात्र काहीच माहिती समजत नसल्याने अखेर २१ ऑगस्टला त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात भक्तीचे खंडाळ्यातील दुर्वास पाटील यांच्याशी प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी आपल्या पद्धतीने वेगाने तपास सुरू केला. शुक्रवारी सायंकाळी दुर्वास याला चौकशीसाठी बोलण्यात आले त्यानंतर पोलीस चौकशीत बरीच माहिती उघड झाली आणि त्यातूनच पोलीस शनिवारी भक्तीचा मृतदेह पर्यंत पोहोचले.  दुर्वासचे भक्तीची प्रेम संबंध होते मात्र त्याचे लग्न ठरवले जात होते त्याच्या भावी पत्नी सोबतचे  त्याचे फोटो पाहून भक्ती आणि दुर्वास यांच्यात वाद झाला यातूनच हा पुढील प्रकार झाला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक विवेक पाटील अधिक तपास करत आहेत.

आंबा घाटात मृतदेह
पोलिसांनी केलेल्या चौकशीत भक्तीचा मृतदेह आंबा घाटात असल्याचे पुढे आले. शनिवारी पोलीस घटनास्थळी रवाना झाले आणि रस्त्यापासून तीस फुटांवर दरीत तिचा मृतदेह असल्याचे दिसले.

पोलीस घटनास्थळी
अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील ,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार आंबा घाटात घटनास्थळी गेले होते.

मदतीसाठी असंख्य हात
देवरुखातील राजू काकडे अकॅडमी सह विजय पाटील दिनेश कांबळे दिनेश गौरी दीपक भोसले सागर चाळके दिग्विज गुरव, शंकर डाकरे यांच्यासह १५  तरुणांनी मृतदेह दरीतून वर आणण्यास मदत केली.

मृतदेह प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून काढला बाहेर
१४ दिवसांनी घटना उघड झाली त्यामुळे मृतदेह पूर्णपणे सडून  गेला आहे तिथे फक्त कवटीच शिल्लक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी बाहेर काढण्यात आला. गेले काही दिवस खूप पाऊस पडत असल्याने त्याची दुर्गंधी पसरली  नाही त्यामुळे इतक्या दिवसात ते कोणाच्या लक्षात आले नाही.

अपहरण करून घातपाताचा संशय
ठरल्या लग्नात बादा येऊ नये यासाठी आपल्या बहिणीचे अपहरण  करून तिच्यासोबत घातपात करण्यात आला असावा असा अंदाज भक्तीचा भावाने आपल्या फिर्यादितीतून व्यक्त केला होता तिची बाब अखेर खरी ठरली.

वायरने गळा आवळून  भक्तीचा खून  केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे पोलिसांनी याबाबत कोणती अधिकृत माहिती दिली नाही पोलीस तपासात हे सर्व उघड होईल  असे पोलिसांनी सांगितले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.