लांजा: जुलै महिन्यात बेशिस्तपणे वाहन चालवणे व वाहतुकीचा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 245 वाहन चालकांवर लांजा पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत चांगला दणका दिला. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. लांजा शहरांमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे दुतर्फा असलेल्या अरुंद रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी नो पार्किंग मध्ये वाहने उभी करण्याचे प्रकार सुरू आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने पोलिसांनी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. जुलै महिन्यामधील लांजाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार साक्षी भुजबळराव व पोलीस शिपाई किशोर पवार यांनी शहरातील बेशिस्त २४५ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून २ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच कोरले फाटा ते बोरीवले पर्यंत जाणाऱ्या राज्य मार्गावर दारू पिऊन चिरे वाहतूक करणाऱ्या ०२ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली



