रत्नागिरी : दरवर्षी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे समाजाकरीता योगदान देत असलेल्या पाच व्यक्तींचा गौरव लायन्स सेवा पुरस्कार देऊन करण्यात येतो. एमजेएफ ला डॉ संतोष बेडेकर यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.या वर्षीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण मा. प्रांतपालांच्या अधिकृत भेटीवेळी करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्ती आणि देत असलेली सेवा पुढील प्रमाणे
श्री ॲड. अविनाश अनंत काळे गोळप पंचक्रोशित करत असलेले विविध समाजोपयोगी कार्य, डॉ शार्दुल महेश केळकर सह्याद्री संकल्प सोसायटी च्या माध्यमातून निसर्ग संरक्षणाचे कार्य ,श्री आनंद डुबाजी राऊत
अग्निशमन दल कर्मचारी या नात्याने उल्लेखनीय कार्य
श्रीमती रेश्मा रमेश साळुंखे आशादीप या मतिमंद निवासी संस्थेत काळजी वाहक म्हणून निरलस सेवा श्रीमती साक्षी सचिन वसावे मूक बधीर विद्यालयात मुलांची देखभाल करण्याचे कार्य पुरस्कार प्राप्त सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शूभेच्छा देण्यात येत आहेत.