रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि समर्थ इनव्हेस्टमेंट आयोजित लायन्स आर्ट ॲन्ड म्युझिक फेस्ट या तीन दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या दिनांक ३१ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता वि.दा.सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे होणार आहे.या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यामध्ये
जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह ,पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड
अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्यधिकारी तुषार बाबर , तहसीलदार राजाराम म्हात्रे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच लायन्स क्लब आणि समर्थ इनव्हेस्टमेंट चे सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणार असून सर्व प्रायोजक सुद्धा उपस्थित रहाणार आहेत.
लायन्स आय हॉस्पिटल च्या नुतन वास्तूच्या उभारणी साठी व अनेक सामाजिक उपक्रमांसाठी आयोजित केलेल्या या निधी संकलन कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका शरयू दाते व वाद्यवृंद यांचा मेलोडियस मोमेंटस् हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिध्द वादक सत्यजित प्रभू, आदित्य ओक, प्रसाद पाध्ये, प्रणव हरिदास आणि कलाकारांचा कलाविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या कला संगीत महोत्सवामध्ये एक दिवस पालकमंत्री नाम. उदय सामंत तसेच आमदार किरण सामंत आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
तीन अप्रतिम कार्यक्रमांची मेजवानी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी मार्फत सर्व रसिकांना मिळणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मॅंगो इव्हेंट्स तर्फे करण्यात आले असून समस्त रत्नागिरीकरांनी या तीन दिवसीय रोज रात्री ९ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे करण्यात आले आहे.