Saturday, March 21, 2026

Latest Posts

लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे “लायन्स बझ” शॉपिंग आणि फूड फेस्टिवल

रत्नागिरी :  रत्नागिरी एमआयडीसी येथे कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ट्रस्ट चे आय हॉस्पिटलचे विस्तारीकरणासाठी मोठय़ा इमारती मध्ये रूपांतर अनेक सुविधांसह होणार आहे. त्या हॉस्पिटलच्या मदतीसाठी शॉपिंग अॅण्ड फुड फेस्टिवल प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यातून मिळणारा सर्व निधी नेत्र रूग्णालयासाठी व नवीन सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उपयोगी ठरणार असल्यो अध्यक्ष गणेश धुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
   लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे दि. 2 ते 5 एप्रिल दरम्यान चार  दिवस जयेश मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे शॉपिंग अॅण्ड फुड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेस  लायनचे  विशाल ढोकळे, खजिनदार लायन अमेय वीरकर, लायन प्राची  शिंदे, लायन श्रिया केळकर, लायन संजय पटवर्धन, लायन ओंकार फडके, लायन सुप्रिया बेडेकर, माजी अध्यक्ष लायन अॅङ शबाना वस्ता यांची उपस्थिती होती. लायन्स क्लब ही एक इंटरनॅशनल सेवाभावी संस्था आहे. त्याचा लायन्स क्लब रत्नागिरी भाग आहे. रत्नागिरी मध्ये या क्लब ची एक वेगळी ओळख आहे. अनेक कायमस्वरूपी उपक्रम रत्नागिरी च्या जनतेसाठी क्लब ने राबविले आहेत. लायन्स क्लब ट्रस्ट चे आय हॉस्पिटल एमआयडीसी येथे कार्यरत आहे. तेथे गरीब लोकांची डोळ्यांची ऑपरेशन होत असतात. येथे डायलेसिस सेंटराया माध्यामतून एका ाग्णी आठवडय़ाला दोन डायलिसीस ही मोफत करण्यात येतात. वाढीव रुग्णसंख्या  आणि डायलेसिसी गरज पाहता लायन्स क्लब ने लवकरा महात्मा फुले जन आरोग्य योजनी मान्यता मिळाल्यावर ही सुविधा पुर्णपणे मोफत दिली जाणार असल्यो सांगितले. 
   आता आय हॉस्पिटलचे मोठय़ा इमारती मध्ये रूपांतर अनेक सुविधांसह होणार आहे. त्या हॉस्पिटलच्या मदतीसाठीच हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यातून मिळणारा सर्व निधी नेत्र रूग्णालयासाठी व नवीन सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या प्रदर्शनाचा माध्यमातून व्यावसायिकांना बाजारपेठ मिळावी व वृद्धी होऊन, आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. महिला बचत गटातील महिला व इतर उदयोन्मुख उद्योजक यांना व्यवसायाची सुवर्णसंधी आणि ग्राहकांना विविध आकर्षक वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी ठेवण्यात आली आहे. हा उपक्रम   सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्वाचा असणार आहे. या प्रदर्शनातून मिळणारा निधी नेत्र रुग्णालयात विस्तारासह नवीन सामजिक कार्यांना बळ देईल असे लायन गणेश धुरी यांनी सांगितले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.