रत्नागिरी: लायन्स क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दिनांक पाच जुलै रोजी दैवज्ञ भवन येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कुरुंदवाड क्लबचे माजी प्रांतपाल पीएमजेएफ लायन सुनीलजी सुतार पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष लायन संजय पटवर्धन, सचिव लायन शरद नागवेकर, खजिनदार लायन मनोज सावंत यांनी सन 2025 – 2026 साठी शपथ घेतली. माजी अध्यक्ष एमजेएफ लायन गणेश धुरी आणि त्यांच्या टीमने पदग्रहण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी गायडिंग पीडीजी एमजेएफ उदयजी लोध, चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष एमजेएफ लायन डॉ संतोष बेडेकर, लिओ अध्यक्ष श्रेयस रसाळ हेही उपस्थित होते. माजी अध्यक्ष एमजेएफ लायन गणेश धुरी, सचिव लायन विशाल ढोकळे, माजी खजिनदार लायन अमेय विरकर यांनी लायन्स क्लब रत्नागिरीची सर्व सूत्रे नूतन अध्यक्षांना आणि त्यांच्या टीमला सुपूर्त केली. लायन्स मधील विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेले सदस्य
संचालक पदासाठी एमजेएफ लायन डॉ रमेश चव्हाण, एमजेएफ लायन हेरंब पटवर्धन, एमजेएफ लायन सुधीर वणजू, लायन बिपीन शहा, एमजेएफ लायन उत्तमचंद ओसवाल, एमजेएफ लायन डॉ शैलेंद्र भोळे, एमजेएफ लायन यश राणे, एमजेएफ लायन दीपक साळवी, पीएमजेएफ लायन प्रमोद खेडेकर, लायन प्रवीण जैन, लायन राजन मोरे लिओ ॲडवायझर लायन श्रेया केळकर क्लब एक्सटेंशन चेअरमन एमजेएफ लायन सुनीलदत्त देसाई, मार्केटिंग अँड कम्युनिकेशन लायन अस्लम वास्ता, लायन्स क्वेस्ट लायन ॲड महेंद्र मांडवकर,आय टी चेअरमन लायन दीप्ती फडके बुलेटिन एडिटर एमजेएफ लायन डॉ संतोष बेडेकर, एलसीआयएफ चेअरमन एमजेएफ लायन शिल्पा पानवलकर,क्लब ॲडमिनिस्ट्रेटर एमजेएफ लायन पराग पानवलकर, जीएसटी चेअरमन लायन श्रेया केळकर जीएमटी चेअरमन लायन अमेय विरकर , जीएलटी चेअरमन एमजेएफ लायन शबाना वास्ता, जीएटी चेअरमन एमजेएफ लायन ओंकार फडके, पीआरओ एमजेएफ लायन सुप्रिया बेडेकर, टेल ट्विस्टर लायन प्राची शिंदे, टेमर लायन स्नेहल राणे, असोसिएट सचिव लायन विशाल ढोकळे, असोसिएट खजिनदार लायन रसिका पटवर्धन, प्रथम उपाध्यक्ष लायन मनोज सावंत, द्वितीय उपाध्यक्ष एमजेएफ लायन डॉ शिवानी पानवलकर, तृतीय उपाध्यक्ष लायन श्रीपाद केळकर यांनी शपथ घेतली.
लिओ अध्यक्ष तांबे आणि टीम ला शपथ देण्यात आली.
कार्यक्रमासाठी लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच समाजातील मान्यवर, पत्रकार आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करून झाली. लिओ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लिओ सिद्धी केळकर हिने गणेश वंदना सादर केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एमजेएफ लायन डॉ शिवानी पानवलकर, एमजेएफ लायन सुनीलदत्त देसाई, लायन श्रेया केळकर यांनी केले.