रत्नागिरी : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मंगळवार २२ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, लोटे परशुराम इंडस्ट्रीयल असोसिएशन, प्लॉट नं. ४०, एम.आय.डी.सी., ता. खेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने कॉरटेव्हा क्रॉप इंडिया प्रा. लि., एम.ई.एस.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, एक्सल इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि घर्डा केमिकल प्रा. लि. आस्थापनांचा समावेश आहे. या कंपन्यांनी विविध पदांसाठी ४५० मनुष्यबळाची मागणी नोंदवली आहे.
जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. इच्छुकांनी २२ जुलै २०२५ रोजी दिलेल्या पत्त्यावर (लोटे परशुराम इंडस्ट्रीयल असोसिएशन, प्लॉट नं. ४०, एम.आय.डी.सी., ता. खेड, जि. रत्नागिरी) बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
हा “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” जिल्ह्यातील बेरोजगारांना उत्तम संधी उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा आहे.