Saturday, March 21, 2026

Latest Posts

शहरातील जयस्तंभ परिसरात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले

रत्नागिरी:- रत्नागिरीत शहराच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जयस्तंभ ते स्टेट बँक मार्गावर असणाऱ्या एका संकुलातील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीला आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
रत्नागिरी शहरात गुरुवार दुपारी भरवस्तीत जयस्तंभ परिसरात दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. रत्नागिरी जयस्तंभ मार्ग हा वर्दळीचा परिसर आहे. याच रहदारीच्या परिसरात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरीची घटना माहिती होताच शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. मात्र, भरदिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे . याठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी भेट दिली असून तपासाची चक्रे पोलिसांनी वेगाने फिरवली आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.