स्थापना – 01 एप्रिल, 2001
श्रीरंग ही रत्नागिरीतील एक अग्रगण्य नाटय संस्था. ज्येष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक अभिनेते भाग्येश खरे यांनी या संस्थेची आजच्या दिवशी स्थापना केली. स्थानिक नाटय कलावंतांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा जेणेकरून एकांकिका स्पर्धा, राज्य नाटय स्पर्धा यामध्ये सहभागी होणे सुकर व्हावे व अभिनय कला वाढीस लागावी अशा हेतूने खरे यांनी आपल्या समविचारी मित्र परिवाराला एकत्र घेऊन ही संस्था स्थापन करण्याचे ठरवून ही संस्था स्थापन केली.
आजपर्यंत विविध ठिकाणी आयोजित अनेक एकांकिका तसेच राज्य नाटय स्पर्धांमध्ये संस्थेने सहभाग नोंदवला आहे.
26 ऑगस्ट, 2001 रोजी संस्थेच्या माध्यमातून पहिला नाट्यप्रयोग सादर करून संस्थेने आपला सहभाग नोंदवला.
संस्था स्थापन झाल्यापासून संस्थेने जवळपास 41 नाटकांचे 390 प्रयोग यशस्वीपणे सादर केले आहेत.
हे सर्व करत असतानाज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर व संस्थेचे स्नेही व हितचिंतक कै. किरण साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाटय लेखन स्पर्धेचे आयोजन संस्था सन 2006 सालापासून आजपर्यंत (कोरोना – कोविड काळ वगळता ) यशस्वीरीत्या करत आहे.
5 वेळा सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी 15 रौप्यपदके, अभिनयासाठीची प्रमाणपत्रे तसेच, तांत्रिक विभागाची पारितोषिके मिळाली आहेत.
श्रीरंगच्या कलावंतांनी सादर केलेल्या नाटकांना राज्य नाट्य स्पर्धांमधून सातत्याने यश मिळाले आहे.
स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेली महत्त्वाची नाटके –
■ मी माझ्या मुलांचा
■ प्रेम तिच्यावरही करावं
■ अतर्क्य
■ ब्रेकिंग न्यूज
■ मनाचिये गुंती
■ शिशिर ऋतूच्या पुनरागमे
■ दि काँशंस
■ एक्झिट
■ उदकशांत
■ सुखांशी भांडतो आम्ही
■ तथास्तु
■ मार्फोसिस
श्रीरंग नाट्य संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या श्रीरंगच्या सर्व सदस्यांना रत्नागिरी मिडीया परिवारातर्फे अनेक शुभेच्छा
🌹🌷🙏🙏🌷🌹
माहिती संकलन – दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी.



