Thursday, March 26, 2026

Latest Posts

श्रीरंग संस्थेचा ३७५ व्या नाटकाचा शुभारंभ प्रयोगाला उद्योगमंत्री ना.डॉ. उदय सामंत यांची हजेरी

रत्नागिरी: गेली २५ वर्ष विविध नाटक करून संस्थेची वाटचाल यशस्वी रित्या पार पाडणाऱ्या श्रीरंग संस्थेचा रविवारी ३७५ व्या प्रयोगाला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी हजेरी लावली. श्रीरंग संस्थेचा रविवारी टिळक आळी गणेशोस्तव मंडळ रत्नागिरी येथे “यू आर ग्रेट पप्पा”  हा प्रयोग होता. डॉ. उदय सामंत आज रविवारी रात्री शहरातील  टिळकआळीच्या १०० व्या गणेशोत्सवात  येऊन  श्री गणरायाचे दर्शन घेतले त्याचवेळेला याठिकाणी श्रीरंग संस्थेचा टिळकआळी  गणेशोत्सव मंडळात २५ वा प्रयोग होता. या प्रयोगाचा ठिकाणी डॉ. उदय सामंत यांनी येऊन श्रीरंग संस्थेला शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना पक्षाचे चंद्रहार पाटील , शहरप्रमुख बिपिन बंदरकर, बंटी कीर, नितीन लिमये, तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, भारतीय जनता पक्षाचे सचिन करमरकर,योगेश करमरकर, प्रशांत डिंगणकर, मंदार खेर, शशिकांत  काळे उपस्थित होते.  यावेळी श्रीरंग संस्थेचे अध्यक्ष भाग्येश खरे, गोपाळ जोशी, पुरुषोत्तम केळकर, प्रतिभा केळकर, पल्लवी गोडसे,सतीश काळे, प्रकाश केळकर, सत्तु  गुरव आणि  संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.