रत्नागिरी : जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सातत्याने कार्य करणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी यांचे वतीने दोन संस्थांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.सदर ब्लॅंकेट हे संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख हाजी इम्तियाज बिजापुरी यांनी ४० ब्लॅंकेट संस्थेला भेट दिली .सदर ब्लॅंकेट हे रत्नागिरी शहरातील आशादीप या दिव्यांग निवासी संस्थेतील मुलांसाठी २० व लांजा तालुक्यातील भाकर संस्थेच्या आजी आजोबांचे घर येथील वृध्दांना २० ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.या दोन्ही संस्थांचे वतीने संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे आभार व्यक्त करुन या सेवेची प्रशंसा केली.यावेळी हाजी इम्तियाज बिजापुरी यांचे ही संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
