Tuesday, March 24, 2026

Latest Posts

समस्यांच्या जाळ्यातील मासेमारी आजपासून बंद

रत्नागिरी : कधी वादळी वारे, कधी मुसळधार पाऊस यात अनेकदा ब्रेक लागलेला यंदाचा मासेमारी हंगाम आता बंद झाला आहे. पावसाळी हंगामासाठी रविवार १ जून पासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद राहणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जून जुलै हा महिना माशांचा प्रजननाचा असतो. याचवेळी पावसामुळे समुद्र खवळलेला असल्यामुळे ०१ जून ते ३१ जुलै या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीला शासनाकडूनच बंदी घातली जाते. मच्छीमार बांधवही या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाही. या दोन महिन्यांच्या काळात ते आपल्या हो

ड्यांची दुरुस्ती रंगोरंगोटी जाळ्यांची दुरुस्ती अशा प्रकारची कामे करतात. खलाशी म्हणून काम करणारे परराज्यातील परदेशातील कामगार या काळात गावी जातात.

९० लाखांचा दंड
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा (अध्यादेश), २०२४अन्वये सन २०२४ ते २०२५ ते आज तगायत एकूण २९ एलईडी लोकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आणि त्यापैकी १८ प्रतिवेदन निकाली काढण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९० लाख ४० हजार रुपये एवढा दंड आकाण्यात आला आहे. पर्ससीन मासेमारीस १२ सागरी महिलाच्या बाहेर कोणताही निर्बंध नसून बहुतांश पर्ससीन मासेमारी ही १२ सागरी महिलाचा बाहेरच होत असते.

१५ दिवस आधीच सुरू झाली बंदी
अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्याचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसायला लागल्याने होल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नका परत किनाऱ्यावर दाखल झाले आहे त्यामुळे यंदाचा हंगाम संपण्यापूर्वीच १५ दिवस आधीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे.

पावसाचा मोठा दणका
गतवर्षी एक ऑगस्टला मासेमारी सुरू झाली असली तरी कधी मुसळधार पावसामुळे कधी वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी मध्ये सातत्याने खंड पडला. मे महिन्यातील बंदी आधीचे दिवस मासेमारीसाठी सर्वात महत्त्वाचे असतात कारण या काळात मासळीला चांगला दर मिळतो पण नेमका याच दहा दिवसात मुसळधार पावसामुळे मासेमारीत खंड पडला त्यामुळे मच्छीमारांचे खूप नुकसान झाले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.