Saturday, March 21, 2026

Latest Posts

सर्वसामान्य लोकांचे आधारस्तंभ : आमदार भैय्याशेठ तथा किरणजी सामंत

रत्नागिरी: आपण आपले आयुष्य जगत असताना अनेक व्यक्तिमत्त्व आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांच्या सहवासात राहताना ही माणसे पूर्णपणे आपली बनून जातात. आपल्याला अपेक्षित कार्य ते सातत्याने पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करत असतात. म्हणूनच ते आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनतात. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे अन्याय होणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आधारभूत काम करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन कार्य करत लोकांचा आधारस्तंभ बनतात. अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य लोकांचा आधारस्तंभ असलेले आमदार किरणजी सामंत यांचा आज वाढदिवस आहे. सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भैय्याशेठ यांना मागील अनेक वर्षे मी ओळखतो. ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत साहेब यांनी राजकारणात सुरुवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत भैय्यांना जवळून अनुभवण्याचा योग नेहमीच येतो. संयम, चिकाटी, अतिशय नम्र स्वभाव, प्रचंड कार्यक्षमता, समृद्ध विचार, चंदनमोगऱ्याचा सुगंध असलेली दैवी शब्द समृद्ध वाणी, उत्कृष्ठ संवादकौशल्य लाभलेले लोभस व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. भैय्या साहेब.
माझ्या अनुभवावरून सांगतो की, मा. भैय्याशेठ यांनी एखादा विषय हाती घेतला की, तो तडीस नेण्याचा त्यांचा प्रयत्न हा नक्कीच त्यांच्यासोबत काम करणाऱ्याला नवी ऊर्जा देणारा असतो. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणासह महाराष्ट्रात भैय्यांचे नाव चर्चेत असते. प्रशासनातील असो वा संघटनेतील कोणत्याही समस्येवर वा अडचणींवर भैय्यांचे मार्गदर्शन हे नक्कीच मोलाचे ठरत असते.
आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाला भैय्या त्यांच्या त्यांच्या – योग्यतेनुसार जबाबदारी देऊन ती पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करत असतात. म्हणूनच आपल्या समोरच्यांना जगाच्या स्पर्धेसाठी तयार करण्याची जबरदस्त ईच्छा असणाऱ्या आणि त्यासाठी जीवापाड घेत असलेल्या मेहनतीचे दुसरे नाव म्हणजे भैय्या. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण याच मेहनतीच्या जोरावर त्यांनी अनेक यशस्वी यशाची शिखरे स्वतः सह आपल्या सहकाऱ्यांना दाखविली आहेत. हे मी त्यांच्या सहवासातून शिकलो आहे. भैयानी काही महिन्यांपूर्वीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघात काम करायला सुरुवात केली. अनोळखी भाग, अनोळखी माणसे, अनोळखी व्यवस्था असतानाही त्यांनी प्रचंड मोठी लाट निर्माण यश संपादन केले. राजापूर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना त्यांनी पाठबळ देत त्यांना स्थैर्यता मिळवून दिली.
संघटनात्मक पातळीवर भैय्यांसोबत काम करण्याची संधी कायम मिळाली. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर आपल्या अचाट ध्येयासक्तीच्या व उद्यमशीलता यांच्या जोरावर धडक देतानाच, आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता, आत्मविश्वास राखून असाध्य चिकाटी बाळगत, अनेक टप्पे त्यांनी पार केले आहेत. हे टप्पे पार करतानाच यादरम्यान आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला जिंकण्याची, नवीन काहीतरी समाजोपयोगी कार्य घडवून आणण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण करण्यात मा. भैयाशेठ यांचा हातखंडाच असे म्हणावे लागेल. आकाशाला गवसणी घालण्याचे धाडस, साहस असतानाही त्यांचा साधेपणा, जमिनीवर पाय रोवून काम करण्याची त्यांची कार्यपद्धती सगळ्यांनाच आपलीशी वाटते. कधी कसला मोठेपणा नाही वा कसला बडेजाव नाही वा कसल्या मान – सन्मानाची अपेक्षा नाही. लोकांसाठी सदैव झटत राहणे हा भैय्यांचा आवडीचा क्षण. म्हणूनच मागील अनेक वर्षे रत्नागिरी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही प्रसंगातील व्यक्ती भैय्यांकडे आधारस्तंभ म्हणूनच पाहत असते. महत्वाचे म्हणजे भैय्यादेखील त्यांच्याशी जवळकीने वर्तुनुक करत त्याला आपलेसे करत असतात. म्हणूनच भैय्याशेठ रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना ते आधारस्तंभच वाटतात. त्यांच्या याच कार्याची पोच म्हणजे मागील विधानसभेत त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने जिंकूनही आणली.
पितृतुल्य आदरणीय अण्णा आणि मातोश्री सौ. स्वरूपा आई यांच्या संस्काराखाली जपलेली माणुसकी भैय्यानी जपली. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सामाजिक कार्यप्रणालीने प्रेरित होऊन आदरणीय अण्णांनी जपलेली सामाजिक निष्ठा, सामाजिक सेवेतून वेळोवेळी आदरणीय भैय्यांनी जपली आहे. त्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामाचा खूप मोठा विस्तार उभारला आहे. आदरणीय अण्णा सामंत साहेबांचा निस्वार्थी सामाजिक कार्याचा वारसा मा. किरणजी सामंत साहेब आज त्याच उमेदीने, उत्साहाने रत्नागिरी तालुक्यात पुढे नेत आहेत. हे पाहिल्यानंतर नक्कीच प्रत्येकाच्या आशा – अपेक्षा पूर्णत्वास जाताना दिसत आहेत त्याचा आम्हांला खूप अभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत साहेब महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असताना तेवढ्याच खंबीरपणे भैय्यांशेठ रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ भक्कम ठेवतानाच संपूर्ण कोकणात संघटना वाढीसाठी प्रयत्नशील असतात. आणि म्हणूनच आज ते राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असतात.
भैय्यांशेठ हे प्रत्येकवेळी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रामध्ये आपल्या कोकणवासीयांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढावे यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत असतात. सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्या सरकारमधील अत्यंत महत्वाची असणाऱ्या सिंधुरत्न योजनेत सदस्य म्हणून भैय्या काम करत आहेत. कोकणाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी त्यांचे नामदार उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न हे खूपच अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुविधा असोत वा इतर क्षेत्रांतील बाबी ह्या परिपूर्ण असाव्यात हा त्यांचा प्रयत्न सर्व जिल्ह्यातील लोकांसाठी आशादायक आहे.
आपल्यावर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांवर आलेली संकटे, अडचणी, अडथळे यातून मार्ग काढत आपल्या आयुष्यातील चढ – उतारावर मात करत सामाजिक कार्यात अनमोल योगदान देण्यात भैय्यांचा हातखंडा आहे. राजकारणात कोणत्याही पदावर सक्रिय नसतानाही लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळात धावून जाणारे भैय्या मी अगदी जवळून पाहिले आहेत. एखादी गोष्ट त्यांनी ठरविली आणि एखाद्याला शब्द दिला, तर तो पूर्ण करण्यासाठी ते दिवसरात्र एक करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील एखाद्याला भैय्यानी शब्द दिला तर ते काम होणारच हा विश्वास लोकांना वाटतो यातच त्यांचे मोठेपण आहे. म्हणूनच पत्रकार असोत वा मित्र वा सहकारी वा विरोधक भैय्यांचा उल्लेख किंगमेकर करतात. यातच त्यांच्या नावाची धमक दिसून येते. त्यांच्यातील धडाडी नजरेत भरते.
सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय, संघटन क्षेत्रातील भैय्यांचे योगदान लक्षणीय आहे. विकासाच्या नवनव्या संकल्पना राबविण्याचा त्यांचा मानस हा नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असतो. परिसरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थाना असोत वा चळवळीना भैय्यांच्या माध्यमातून अनेकवेळा मदत झाली आहे. म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात त्यांचे चाहते पाहायला मिळतात. महत्वाचे म्हणजे पक्षनिष्ठा जपत वैचारिक स्पष्टतेने काम करणे, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून कामे मार्गी लावणे, ही त्यांची नेतृत्वशैली आहे. राजकारणात वाढत चाललेल्या दुराव्याच्या काळात जनतेशी थेट संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून भैय्यांचे वेगळेपण अधोरेखित होते. महत्वाचे म्हणजे भैय्यांचे अजून एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे राज्य असो वा जिल्हा स्तरावर काम करत असताना त्यांना कुणीही कधीही फोन करू देत, ते त्या फोनला तात्काळ उत्तर देतात. कामाच्या व्यापात जर काही कारणाने उत्तर देता आले नाही तर ते स्वतःहून फोन करून त्या – त्या व्यक्तीची माहिती घेऊन त्याच्या अडचणी समजून घेतात. त्याबर उपाययोजना करतात. याबाबत त्यांचे मोठेपण रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेकांनी अनुभवले आहे. म्हणून तर त्यांना एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉंल ही बिरुदावली लावतात. आमदार म्हणून काम करताना असो राज्य स्तरावर काम करताना आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणारा नेता दुसरा पाहिला नाही. भैय्या कितीही कामात आणि घाईत असले तरीही ते न विसरता फोन करतात.
माझ्या मते समाजात काही माणसे खूप उंचीची असतात. त्यांच्या आदर्श गुणांनी समाजात संस्काराचे बीजे रोवली जातात. सर्वसामान्य लोकांना आजही त्यांच्यात एक पारदर्शी मन दडलेले आहे, याचे प्रतिबिंब दिसते. आपल्या कार्यामधून सर्वसामान्य माणसाच्या वेदनांचा हुंदका त्यांना जाणवतो. सर्वसामान्य माणूस जे आयुष्य जगतात ते अधिक सुसह्य व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे असतात. अशा काही विचार, कार्य, कर्तृत्व यामध्ये उत्तुंग उंची असणाऱ्या व्यक्तींमध्ये भैय्यांचा समावेश करायला मला आवडेल. कारण सामान्य कार्यकर्त्यापासून आमदारपदापर्यंतचा किरण सामंत यांचा प्रवास संघर्ष, संयम आणि निष्ठेचा आहे. राजकारणाकडे त्यांनी कधीही सत्तेचे साधन म्हणून पाहिले नाही, तर समाजसेवेचे प्रभावी माध्यम म्हणून पाहिले. जनतेशी थेट संवाद, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची वृत्ती आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठीची तत्परता ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.
आमदार म्हणून कार्यरत असताना मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच त्यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रत्नागिरी- संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उदयजी सामंत साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहताना त्यांच्या प्रत्येक निर्णयातून सामाजिक परिवर्तन होईल यासाठी प्रयत्नशील असणारे आदर्श बंधुतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे भैय्याशेठ. नामदार उदयजी सामंत साहेबांच्या आणि सहवासात असणाऱ्या सर्वांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे अचल उभे राहताना दिशादर्शकाचे कार्य भैय्या करताना दिसतात. मुळात लोकशाही व्यवस्थेचा खरा आधार म्हणजे जनतेचा विश्वास. हा विश्वास शब्दांनी नव्हे, तर सातत्यपूर्ण कार्यातून मिळवावा लागतो. भैय्यानी तो आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतून हाच विश्वास संपादन केला आहे.
अशा या लोकानुनयी नेतृत्वास त्यांच्या वाढदिवसाच्या खुप – खुप शुभेच्छा. एका समाजशील पित्याचे तेवढेच कर्तृत्ववान पुत्र, एक लोकप्रिय विकासपुरुष असणाऱ्या लोकप्रतिनिधींचे खंबीर बंधु, आपल्या मित्रांना ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे जिवलग मित्र, जनसेवेला वाहून घेतलेले तथा प्रचंड संघर्ष करत स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक, विविध संघटनांच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा जपत अडचणीत असणाऱ्यांना आणि चाचपडणा-यांना खंबीर साथ देत सर्वांचाच आधारस्तंभ असणाऱ्या आदरणीय भैय्या तथा माननीय किरण सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या खुप – खुप शुभेच्छा.
त्यांच्या दिमाखदार वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा.

💐💐🚩🚩🙏🙏 शुभेच्छुक – श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील,
उपजिल्हाप्रमुख – शिवसेना, जि. रत्नागिरी.
संचालक – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी
अध्यक्ष – कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.