रत्नागिरी:- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार ८ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी १० ते ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग ६६ संदर्भात आढावा बैठक. (स्थळ – शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) सकाळी ११ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून प्रयाण. सकाळी ११ ते ११.१५ वाजता रत्नागिरी ते हातखंबा (15 किमी). सकाळी ११.१५ ते १२.१५ पर्यंत
हातखंबा ते वाकेड, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ७ ची पाहणी (४० किमी). दुपारी १२.१५ वाजता ओणी-अणुस्कुरा घाट- कराड मार्गे जि. साताराकडे प्रयाण.