रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साळवी येथील डम्पिंग ग्राउंड येथे टाकलेल्या कचऱ्याला सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे आजूबाजूला धोका निर्माण होत असून आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या आगीवर तातडीने नियंत्रण घालावे अशी मागणी स्थानिक नगरसेविका पूजा दीपक पवार यांनीनिवेदनाद्वारे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे डम्पिंग ग्राउंडमध्ये शहरातील कचरा टाकला जातो. वास्तविक मध्यावधी ठिकाणी पडत असलेल्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होत असतानाच या कचऱ्याला रात्रीच्या वेळी आगी लागतात. यामुळे परिसरात धोका निर्माण होत असून त्यातून निर्माण होणाऱ्या विषारी दूर संपूर्ण परिसरात पसरत असून त्यामुळे आरोग्याला याचा धोका आहे.
या धुरामुळे आजूबाजूच्या नागरिकांना, रुग्णांना सतत त्रास होत असतो. तसेच डोळ्यांची जळजळ, घशाचे संक्रमण यांसारख्या तक्रारी रहिवाशांमध्ये वाढत आहेत. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सौ. पूजा दीपक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच या ठिकाणी आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी त्या ठिकाणी तत्काळ अग्निशमन दल किंवा पाण्याची टँकरची व्यवस्था तत्काळ करावी. यावेळी त्यांच्यासोबत विभागप्रमुख दीपक पवार देखील उपस्थित होते.



