Thursday, July 31, 2025

Latest Posts

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक; एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

सावर्डे: सावर्डे पोलिसांनी चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹१,३४,२४,५८९/- किमतीचा मुद्देमाल जप्त करत १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सावर्डे महावितरण सब स्टेशनजवळ सचिन वारे यांच्या वहाळ फाटा येथील मोकळ्या जागेत ठेवलेले ₹७४,८४,०९८/- किमतीचे ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल चोरण्यात आले होते.
या प्रकरणी फिर्यादी अखिलेष कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय ४७, मूळ रा. विरार, पालघर; सध्या रा. भरणेनाका, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या संमतीशिवाय हे ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल ट्रेलरमधून चोरून नेण्यात आले होते. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
तपासादरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेल्या तीन ट्रेलर्सचा शोध घेतला. त्यापैकी दोन ट्रेलर्स कोलाड, जिल्हा रायगड येथे, तर एक ट्रेलर कामथे येथे मिळून आला. या ट्रेलर्सवरील तीन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुरेश नंदलाल खारोल (वय २४, रा. जोताया, जि. अजमेर, राजस्थान), पिंटु भना (वय २२, रा. कैसरपुरा, जि. अजमेर, राजस्थान) आणि पुखराज श्रीकिशन भील (वय २२, रा. सुरजपुरा, जि. अजमेर, राजस्थान) यांचा समावेश आहे.
या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेले ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल आणि गुन्ह्यात वापरलेले तीनही ट्रेलर जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹१,३४,२४,५८९/- इतकी आहे. अटक केलेल्या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण उपविभाग राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांनी केला. या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गमरे, तसेच पोलीस हवालदार साळुंखे, कांबळे, कोळेकर, महिला पोलीस हवालदार कान्हेरे, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस शिपाई भांगरे, जड्यार, महिला पोलीस कॉन्स्टेबल मुंढे, जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण आणि साठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.