Wednesday, July 30, 2025

Latest Posts

सिंधुदुर्गातील सावडाव धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण! राज्यातून पर्यटकांचा ओघ वाढला

कणकवली : निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यात, कणकवलीपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेला सावडाव धबधबा सध्या राज्यभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. पावसाळा सुरू होताच या धबधब्यावर पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे, ज्यामुळे हे ठिकाण पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे चमकू लागले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत सावडाव धबधब्याबद्दल फारसे कोणाला माहिती नव्हते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांत वाढलेल्या पर्यटक संख्येमुळे आणि प्रसारमाध्यमांतील प्रसिद्धीमुळे हा धबधबा आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात नावारूपाला आला आहे. ‘सावडाव’ हे नाव ऐकताच लगेच धबधब्याची आठवण येते आणि अनेकजण “सावडाव धबधब्याला पाणी आले का?” असे विचारू लागले आहेत. जणू काही या धबधब्याने सावडाव गावाला आणि तेथील ग्रामस्थांना एक नवी ओळखच निर्माण करून दिली आहे.
सावडाव धबधबा एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनाही रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळाली असून, अनेकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. या धबधब्याच्या माध्यमातून नैसर्गिक सौंदर्याचे जतन करत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असल्याचे चित्र आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.