Thursday, July 31, 2025

Latest Posts

स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीने लढविणार

रत्नागिरी: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचयात निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कालच याबाबत शिवसेना नेते उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. त्याचे तंतोतंत पालक करून एकदिलाने जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवू, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडीत यांनी व्यक्त
केला.
मंत्री उदय सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, शहर प्रमुख बिपिन बंदकरक, नेते सुदेश मयेकर, विजय खेडेकर, महिला संघटक कांचन नागवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल पंडीत म्हणाले, महायुती म्हणून यापूर्वी देखील लोकसभा निवडणुका लढल्या त्यामध्ये यश मिळाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तर सर्वांत मोठा विजय महायुतीला मिळाला. एकत्रित निवडणुक लडण्याचा मोठा फायदा महायुतीला झाला आहे. त्यामुळे यापूर्वी अडच वर्षांमध्ये तत्काली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने चांगले काम केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवित पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सर्वसामान्यांना न्याय देत सरकार गतिमान केले आहे. एकदिलाने आणि एक संघ काम केल्यामुळे राज्यात जसा महायुतीचा भगवा फडकला, तसाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती आणि एकत्रित लढुन जिल्ह्यात पुन्हा महायुतीचा भगवा फडकवु. सत्तेत आल्यापासून मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांनी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात विकास निधी आणला आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी केली आहे. रत्नागिरी शैक्षणिक हब बणविण्याच्यादृष्टीने त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. कित्येक वर्षे जवढा निधी पाहिला नाही, तेव्हा सामंत यांच्या रुपाणे जिल्ह्यात निधी आला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणयाचा विडा त्यांनी उचलाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता वेगळ्या दृष्टीने पहाते. म्हणून आगामी निवडणुका महायुती म्हणून ठाम विश्वासाने लढणार, असल्याचे पंडीत यांनी सांगितले.
   भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे या नेत्यांची लवकरच महायुतीबाबत बैठक होणार आहे. त्यामध्येही युतीची एकत्रित घोषणा केली जाणार आहे. त्या दरम्यान जागा वाटपाचे धोरण निश्चित केले जाईल, असेही श्री. पंडीत म्हणाले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.