रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे सोमवारी रात्री अकरा वाजता गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होती ही वाहतूक मंगळवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी सुरू करण्यात आलेली आहे तब्बल १५ तासांनी ही वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. तसेच पलटी झालेल्या टँकर सुद्धा बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेला आहे. या ठिकाणी ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव हे स्वतः घटनास्थळी १५ तास होते. सुदेश कंदकुर्तीकर मोटार वाहन निरीक्षक देखील या ठिकाणी होते. तसेच या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील मोठ्या संख्येने होते.