रत्नागिरी : मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरी तालुका मनसे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्सवात संपन्न पार पडले. रत्नागिरी तालुका मनसे व इन्फिंगो आयकेअर हॉस्पीटल रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा रत्नागिरीतील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी मेहनत घेतली याप्रसंगी मनसेच्या वतीने इन्फिंगो आयकेअरच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानण्यात आले.