रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकर वाडा जेटीवरील अनेक वर्ष असलेल्या अनधिकृत बांधकामांवर सोमवारी सकाळी मत्स्य व बंदर विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या मिरकरवाडा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जेसीबीच्या साह्याने अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

