Thursday, August 14, 2025

Latest Posts

ठेवींचे पैसे गतीने देवून ठेवीदारांना दिलासा द्यावा: गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : महाराष्ट्र ठेवेदारांच्या वित्तीय संस्थांमध्ये हितसंबंधांचे संरक्षण कायदा अंतर्गत सर्व सक्षम प्राधिकारी यांनी ठेवीदारांच्या ठेवी स्वरूपातील पैसे परत मिळवून द्यावे. त्यामुळे निश्चितच  ठेवीदारांना  दिलासा मिळेल. यासाठी समर्पण वृत्तीने काम करावे, अशी सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली.  महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चा अंमलबजावणी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित सक्षम प्राधिकार्‍यांकडू आढावा घेण्यात आला.  या कायद्याअंतर्गत अशाप्रकारे सक्षम प्राधिकार्‍यांकडून प्रथमच आढावा घेण्यात आला. बैठकीस मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दीपक देवराज, उपसचिव यमुना जाधव आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कदम  म्हणाले, कायद्यांतर्गत ठेवीदारांचे  पैसे परत मिळवून देण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थांच्या मालमत्ता  जप्तीची कार्यवाही पूर्ण करावी. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया गतीने राबवावी. सर्व सक्षम प्राधिकरणांनी प्रकरण निहाय याबाबत लिलाव स्तरावरील, न्यायालय स्तरावर असलेली माहिती शासनास पुढील १५ दिवसाच्या आत सादर करावी. विभागाने याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा. गुन्ह्याच्या स्वरूपावरून निकाली काढण्याच्या प्रकरणांचा प्राधान्यक्रम ठरवावा.  तसेच प्रकरणनिहाय आढावा घ्यावा.  या संपूर्ण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट कार्यप्रणाली तयार करून नियोजनबद्धपणे कार्यवाही पूर्ण करावी. सक्षम प्राधिकार्‍यांना या कायद्याचे सखोल ज्ञान होण्यासाठी,  कायदा विषयक काही सूचना व संवादाचे आदान – प्रदान होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करावे. याबाबत पुन्हा बैठकीचे आयोजन करून आढावा घेण्यात येईल.  असेही राज्यमंत्री श्री कदम यांनी स्पष्ट केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.