स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. १० ऑगस्ट सायंकाळी ४ वाजता, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी
रत्नागिरी : स्मार्ट श्रावण सखीच्या या स्पर्धेच्या अनुभवातून आपण काय शिकलात? असा प्रश्न जेव्हा परीक्षकांनी स्मार्ट सखीच्या स्पर्धकाला विचारला तेव्हा एका सखीने उत्तर दिलं, ” या स्पर्धेतून आम्हाला मिळाला; आत्मविश्वास आणि खूप सारा आनंद”. तुमच्यात असा वेगळा कोणता गुण आहे जो या स्पर्धेमध्ये सहभागी इतर स्पर्धकांमध्ये नाही.” यावर सखीने उत्तर दिलं, “सगळ्याच स्पर्धक इतक्या छान तयारीच्या आहेत की माझ्यातला असा स्पेशल गुण ओळखणं खरंच कठीण आहे”. ही उत्तरं ऐकल्यानंतर लक्षात आलं की स्मार्ट श्रावण सखीची ही स्पर्धा खरोखरच स्त्रीत्वाचा उत्सव आहे!
ब्युटीशियन, वकील, शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ती आणि कुटुंबामध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका पाडणारी गृहिणी…. अशा विविध जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडणारी आमची ही सखी या स्पर्धेमध्ये आत्मविश्वासपूर्ण होती. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वप्न, बकेट लिस्ट याबद्दल भरभरून बोलली. सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्तेची जोड असणाऱ्या या ५४ स्पर्धकांमधून २१ सखी अंतिम फेरी करता निवडणं खूप कठीण काम होतं. निवड झालेल्या २१ सखी आता अंतिम फेरी करता आता सज्ज आहेत.
“उदय सामंत प्रतिष्ठान तर्फे आयोजित या स्पर्धेमुळेच आम्हाला हक्काचं व्यासपीठ मिळालं. आम्ही मनमोकळेपणाने स्वतःबद्दल बोलू शकलो. आमचा आत्मविश्वास पुन्हा एकदा आम्हाला गवसला”,आमच्या स्मार्ट सखी कडून मिळालेल्या या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत.
या स्पर्धेची *अंतिम फेरी रविवारी १० ऑगस्टला संध्याकाळी ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये* पार पडणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी जरूर यायचे आहे या आपल्या सख्यांना प्रोत्साहन देण्यासाठी……..
*अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या २१ सखी आहेत-*
मैथीली संदेश लांजेकर
श्वेतांबरी प्रफुल्ल शिर्के
प्रियदर्शनी लक्ष्मीकांत सावखेडकर
अनघा अमोल नाचणकर
तृप्ती हर्षद रेडीज
ऋतुजा महेंद्रकुमार कदम
जेनी मच्छिंद्र चव्हाण
पूनम नितीन पाटील
श्वेता सुरेश यादव
रिमा अजय देसाई
सौम्या सुधेन्दू घुडे
दिशा संदेश भाटकर
दिपीका दिनेश कुबल
प्रिती प्रशांत रसाळ
कुमुदिनी प्रकाश शेट्ये
अंजनी संदिप तांबे
विजेता विजय मोर्ये
संपदा प्रमोद सावंत
योगिता विजय खांडेकर
समिक्षा संतोष कोळेकर
राधिका सुमीत नागवेकर