Saturday, March 15, 2025

Latest Posts

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

कणकवली : राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला नेहमी प्राधान्य राहिले आहे.  राज्यातील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरुन रंगविणे बंधनकारक आहे. तसेच मासेमारी नौकेवरील प्रत्येक खलाशांने स्मार्ट कार्ड / QR Coded  आधार कार्ड जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी निर्गमित केले आहेत.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने  हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंडियन मर्चंट शिपिंग ॲक्टच्या १९५८ मधील ४३५ (एच) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन धिनियम १९८१ व (सुधारित २०२१) कलक ६ (४) नुसार भारतातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरूपी दिसेल असे रंगविणे आवश्यक  असून प्रत्येक खलाशाने QR Coded  आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. वरील कार्यवाही सर्व मच्छिमार सहकारी संस्थांनी तात्काळ करणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमुद आहे.
वरील आदेशाची परिपूर्ण्ता झाल्याशिवाय कोणत्याही नौकेचे मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करु नये, अशा नौका ज्या नोंदणी क्रमांक व कलर कोडचे ठळकपणे प्रदर्शित करीत नाहीत व नौकेवरील खलांशाकडे QR Coded  आधार कार्ड अथवा स्मार्ट कार्ड आढळून येत नाहीत अशा नौका मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सु -२०२१)अंतर्गत मासेमारी परवाना अटी-शर्तींचा भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करण्याबाबत नियमोचित कार्यवाही करण्यात यावी असेही या आदेशात नमुद आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.