रत्नागिरी : प्रयागराज रेल्वे स्थानकात भाविकांचे आगमन आणि निर्गमन अत्यंत शांततेत सुरू असल्याचे रेल्वे ने म्हटले आहे.कालच्या दिवसात साडे बारा लाख प्रवाश्यानी रेल्वेने प्रवास केला.जवळ जवळ ३३० रेल्वेचे या स्थानकात आगमन व निर्गमन करण्यात आले.आज ही येथून १३० रेल्वे भाविकांना घेऊन देशाच्या विविध भागात रवाना झाल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली आहे.कुंभ मेळ्याच्या परिसरातील सर्वच रेल्वे स्थानकात भाविकांच्या सुविधेकरिता यंत्रणा सज्ज असल्याचे गिरीश करंदीकर यांनी म्हटले आहे.
