रत्नागिरी : शनिवारपासून (१५ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या सीबीएसई या दहावी आणि १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या सेंट्रल बोर्ड परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एमआयडीसीतील नवनिर्माण हाय इंग्रजी मीडियम स्कूल येथे करण्यात आली आहे.
यामध्ये जयगड येथील जिंदाल विद्यामंदिर, पोतदार इंटरनॅशनल, सर्वंकष विद्यामंदिर आदी शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दहावी परीक्षेसाठी (AISSE
Roll number) 15197404 ते 15197532
अशा एकूण १२९ विद्यार्थ्यांची तसेच बारावीच्या (XII AISSCE) Roll number 15630801 ते 15630828 अशा २९ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नवनिर्माण हायमध्ये करण्यात आली आहे.
ज्या पालक, विद्यार्थ्यांना आसन व्यवस्था पहावायची आहे, त्यांनी उद्या (१४ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजल्यानंतर शाळेला भेट द्यावी, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी केले आहे.