Friday, March 14, 2025

Latest Posts

५८ व्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीची निधी सप्रे बनली राज्य कॅरम विजेती

मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने आयोजित ५८ व्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी आपली खेळाची धार दाखवली.
१२ वर्षाखालील मुलींच्या गटात, रत्नागिरीच्या निधी सप्रेने ठाण्याच्या देविका जोशीला २२-०, २३-० अशा थेट विजयासह विजेतेपद जिंकले. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात, मुंबई उपनगरच्या तनया दळवीने रत्नागिरीच्या स्वरा कदमला तीन सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षात १४-११, १२-१५, १९-५ अशा रोमांचक विजयासह विजेतेपद पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेने पुण्याच्या तनया पाटीलवर ११-४, २-१७, ७-६ असा निसटता विजय मिळविला. विजेत्यांना राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले आणि मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम संघटनेचे सहसचिव संजय बर्वे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.