रत्नागिरी : राजन साळवी शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानांच एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनाम देत आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. राजन साळवी यांची आता पुढची भूमिका नेमकी काय असणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
