रत्नागिरी : भारतातील कमी वयाची जलतरणपटू इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झालेली रत्नागिरीतील एक वर्ष 9 महिने दहा दिवसाची वेदा परेश सरफरे हिने 100 मी अंतर अवघ्या 10 मिनीटे 8 सेकंदामध्ये पार करुन जागतीक विक्रम केला आहे. म्हणून तिचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता शिवसेना नेते तथा मा.खासदार मा.श्री.विनायकजी राऊत साहेब यांचे संपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात येणार आहे.तरी रत्नागिरी तालुक्यातील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख यांनी उपस्थित रहावे, हि विनंती.
आपला
शेखर घोसाळे
तालुकाप्रमुख रत्नागिरी



