Monday, March 23, 2026

Latest Posts

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा

रत्नागिरी  : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०१११) रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ६.२० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं.१ शतकोत्तर अमृत महोत्सव शुभारंभ समारंभास उपस्थिती. (स्थळ : आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी) सकाळी ११.३० वाजता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पंच शिबीर २०२५ (स्थळ : देवज्ञ समाज, नाचणे रोड, रत्नागिरी) दुपारी १२.३० वाजता
माझी शेती माझा अभियान स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती (स्थळ : ओंकार अॅग्रोटेक, सुभाष रोड, रत्नागिरी) दुपारी १.०० वाजता उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित मंगळागौर स्पर्धा २०२५ शिरगाव जिल्हा परिषद गट येथे भेट (स्थळ : ओंकार मंगल कार्यालय, गांजुर्डा, शिरगाव, रत्नागिरी). दुपारी २.०० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने चिपळूण कडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता रत्नागिरी जिल्हा शिवसेना कार्यकारिणी बैठक (स्थळ : अतिथी सभागृह, चिपळूण, जि. रत्नागिरी)  सायंकाळी सोईनुसार चिपळूण येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ आयोजित मूर्ती बनविण्याची स्पर्धा येथे सदिच्छा भेट (स्थळ : शिके प्रशाला रत्नागिरीचे रंजन मंदिर सभागृह) दुपारी १२ वाजता उद्योजक श्री. संदिप यशवंत पावसकर यांचा कौतुक सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : महाकाली पॅलेस हॉल, पावस, जि.रत्नागिरी) दुपारी ३ वाजता उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित मंगळागौर स्पर्धा २०२५ नाचणे जिल्हा परिषद गट येथे भेट (स्थळ: बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर, रत्नागिरी). दुपारी ४ वाजता रत्नागिरी रिल्स स्पर्धा २०२५ बक्षिस वितरण समारंभ. (स्थळ : अंबर हॉल, टी. आर.पी. रत्नागिरी). सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी न.प. आणि रत्नागिरी पोलीस यांच्या सहकार्याने आयोजित “सायबर संस्कार” कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी). सायंकाळी ६.३० वाजता श्री रत्नागिरीचा राजा आगमन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : साळवी स्टॉप, रत्नागिरी) सायंकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ १०.५० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं. २०११२) मुंबईकडे प्रयाण

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.