पुणे: मनो-वर्धन योगसंस्था आणि मिविक युथ फाउंडेशन
आयोजित आरोग्यवंदन…. यथाशक्ती सूर्यनमस्कार यज्ञ हा कार्यक्रम वीर बाजी पासलकर स्मारक, पुणे येथे रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष होते.यामध्ये जवळपास *70 साधकांनी 3500* सूर्यनमस्कारांच्या समिधा सूर्यनारायणाला अर्पण केल्या व स्वतःच्या निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली.
अबाल वृद्धांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
समाजाचे आरोग्य, दीर्घायुष्य व कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



