रत्नागिरी: समाजाचे दिवंगत नेते नंदकुमार मोहिते यांची कन्या कुमारी ऋतुजा नंदकुमार मोहिते हिने मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून आपले एल.एल.बी. (LL.B.) चे शिक्षण पूर्ण करून मोठे यश संपादन केले आहे. अलीकडेच सिद्धार्थ लॉ कॉलेज, मुंबई येथे झालेल्या पदवीदान समारंभात माजी कुलगुरू सन्माननीय अभय ओका यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.सध्या ऋतुजा मुंबई युनिव्हर्सिटी फोर्टमधून एल.एल.एम. (LL.M.) चे पुढील शिक्षण घेत आहे. समाजातील विविध स्तरांमधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ऋतुजाचे वडील, कै. नंदकुमारजी मोहिते, यांची अशी तीव्र इच्छा होती की तिने वकिलीचे शिक्षण पूर्ण करावे. ऋतुजाने आज त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. दुर्दैवाने, हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आज ते या जगात नाहीत. तिचे हे यश पाहून आज सर्वात जास्त आनंद त्यांनाच झाला असता.या यशाबद्दल ऋतुजाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



