Friday, March 27, 2026

Latest Posts

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे ” महालक्ष्मी जागर ” कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी: प्रतिवर्षी प्रमाणे अश्विन शुद्ध सप्तमी शके 1947सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा यांचे विद्यमाने ” श्री महालक्ष्मी पूजन व जागर ”  याचे आयोजन ‘श्रीमान यशवंत हरी  गोखले भवन”, नाचणे साळवी स्टॉप लिंक रोड येथे आयोजित केले आहे.
सर्व हिंदू भाविकांनी रात्रौ 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत होणाऱ्या जागर कार्यक्रमात उपस्थित राहून दर्शनाचा  व प्रसादाचा लाभ घ्यावा. सायंकाळी होणाऱ्या देवीची पूजा , आरती व त्यानंतर होणाऱ्या भजन, आरत्यांचा  व भोवत्यांचा आनंद घ्यावा, तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा.
नवविवाहित सुवासिनी ज्यांना महालक्ष्मी वसा पूजन करावयाचे आहे त्यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2025 पर्यंत खलील व्यक्तीशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी.
वसापूजनाचे सर्व साहित्य ब्राह्मण सभे कडून देण्यात येईल.
अधिक माहिती साठी  सौ.अदिती राजेंद्र भावे 9423831500
श्री. रवींद्र रानडे 9423831570
यांचेशी संपर्क साधावा. असे कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री अनंत आगाशे यांनी आवाहन केले आहे.
हा कार्यक्रम सर्व हिंदू बांधवांसाठी  खुला आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.