Monday, March 23, 2026

Latest Posts

कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये; नितेश राणे यांचा इशारा

रत्नागिरी: रत्नागिरी मध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी आहेत. नाही झाली तर भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे. कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये आणि कोणी कमी लेखू नये, असा टोला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री सामंत यांना लगावला. एका कार्यक्रमानिमित्ताने मंत्री नितेश राणे रविवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना रत्नागिरी महायुतीबाबत विचारले असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले आहे त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे.  कार्यकर्त्याचा सन्मान राखूनच महायुती झाली पाहिजे असे ते म्हणाले. कोणी आम्हाला कमी लेखू नये आणि कोणी आम्हाला हलक्यातही घेऊ नये तसेच आम्हाला सुक्या धमक्याही देऊ नयेत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कार्यकर्ते जर काही बोलत असतील तर त्याची पक्षश्रेष्ठी दखल घेतील असेही मंत्री नितेश आणि म्हणाले. कार्यकर्त्याला सन्मान जनक वागणूक मिळते का नाही? हे पाहण भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. भाजपचा कार्यकर्त्याला  मानसन्मान मिळावा म्हणून आम्ही बोलतो असेही मंत्री नितेश आणि यांनी सांगून पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू असे त्यांनी सूचक विधान केले काही दिवस थांबा काळजी करू नका असेही ते कणकवलीतील वादावर म्हणाले.

नोटीस हातात आलेली नाही

अल्पसंख्यांक आयोगाची नोटीस माझ्या हातात आलेली नाही त्यांनी त्यांचे काम करावे मी माझे काम करत राहणार असेही ते म्हणाले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.