रत्नागिरी: शहरानजीकच्या साळवी स्टॉप येथे मिऱ्या नागपूर हायवेच्या कामाचे काम सध्या सुरू आहे या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास रेडकू पडल्याचे काही नागरिकांना निदर्शनास आले.
नागरिकांनी तत्काळ तिथल्या स्थानिक नगरसेविका सौ पूजा दीपक पवार यांना कळविले. पूजा पवार यांनी तत्काळ घटनेची माहिती नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिली आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी जाऊन त्या रेडकुला सुखरूप बाहेर काढताना त्या तिथे उपस्थित राहिल्या.
यावेळी त्या ठिकाणी नगरसेविका पुजा पवार, शांताराम नारकर, शुभांगी बिंगी, नागरिक राजेंद्र कळंबटे, उपस्थित होते. नगर परिषद संदेश कांबळे, यांनी यावेळी तत्काळ जेसीबी उपलब्ध करून दिला. तसेच ज्या खड्ड्यांमध्ये जे रेडकू पडलं होतं त्या ठिकाणी संबंधित हायवेच्या ठेकेदाराला आर आय पी एल प्रियरंजन कुमार यांना बोलावून पूजा पवार यांनी या ठिकाणी बॅरिडेट्स लावा आणि रेडियम लावा अशा प्रकारच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या आहेत.



