रत्नागिरी: सहाय्यक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई येथे कार्यरत असलेले शैलेश दत्तात्रय सणस यांची खेड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. शैलेश सणस हे रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी ०६ महिने कार्यरत होते. तसेच शैलेश सणस यांनी रत्नागिरी पोलिस अधिक्षक कार्यालय येथे जिल्हा विशेष शाखेत त्यांनी ०८ महिने काम पाहिलेले आहे. गुरवारी सायंकाळी प्रशासनामार्फत बदलीचे आदेश काढण्यात आले. या आदेशामध्ये शैलेश सणस यांची खेड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



