Monday, March 23, 2026

Latest Posts

गणपतीपुळ्याचा किनारा पर्यटकांनी फुलला

संकष्टी चतुर्थीनिमित्त आज दिवसभरात ३५ हजार पर्यटकांनी दिली भेट
गणपतीपुळे : सलग दोन दिवस सुट्टी आणि संकष्टी चतुर्थी असा योग साधत आज (८ डिसेंबर) रत्नागिरी तालुक्यातील जागतिक कीर्तीचे तीर्थस्थळ श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. आज दिवसभरात ३५ हजार पर्यटकांनी गणपतीपुळे येथे भेट दिल्याने गणपतीपुळ्याचा किनारा अक्षरशः पर्यटकांनी फुलला होता.

शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी आल्याने पर्यटकांची पावले शुक्रवारपासूनच विकेंड एन्जॉय करण्यासाठी रत्नागिरीकडे वळत होती. त्यात रविवारी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे घाटमाथ्यावरून गणपतीपुळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. तसेच मराठवाडा, विदर्भ येथूनही पर्यटक दर्शनासाठी गणपतीपुळे येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
त्यामुळे आज दिवसभर दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळाले. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर समुद्रावर जाऊन स्नानाचा मनसोक्त आनंद पर्यटकांनी लुटला. पाऊस गेल्यानंतर आता समुद्रातील साहसी खेळही (वॉटर स्पोर्ट्स) सुरू झाले असून, पर्यटकांनी या साहसी खेळांच्या माध्यमातून लाटांवर स्वार होण्याचा आनंद लुटला.
दरम्यान, अति उत्साही पर्यटकांमुळे समुद्रकिनारी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून, “कोणीही खोल समुद्रात जाऊ नका. सूचनांचे पालन करा आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करा” अशा प्रकारच्या सूचना बाहेरून येणाऱ्या सर्व पर्यटकांना पाण्यात उतरण्याआधी देण्यात येत होत्या.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.