Thursday, March 26, 2026

Latest Posts

चांदोरकर ग्रुपच्या सुमधुर आरत्या आकाशवाणीवर

रत्नागिरी – कोकणातली गणपतीच्या आरत्यांची एक वेगळी परंपरा आहे. वाद्यांच्या साथसंगतीने होणाऱ्या चांदोरकर ग्रुपच्या या सुमधुर आरत्या यावर्षी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारीत होणार आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 27 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी हा सुमधुर आरत्यांचा प्रासंगिक कार्यक्रम प्रसारीत होणार आहे. आरती स्पर्धेत गेली दोन वर्ष प्रथम क्रमांक मिळवलेला चांदोरकर ग्रुप हा कार्यक्रम सादर करणार आहे. यामध्ये मंदार महादेव चांदोरकर, महादेव जगन्नाथ चांदोरकर, अमेय विश्वास चांदोरकर, समीर प्रशांत चांदोरकर , संदीप सुहास चांदोरकर यांनी या आरत्या गायल्या आहेत.
या सुमधुर आरत्यांच संगीत आणि  हार्मोनियमची साथ केली आहे पंडीत  अवधूत अनंत बाम यांनी. तबलासाथ पुष्कराज महादेव चांदोरकर, पखवाजसाथ तन्मय गजानन चांदोरकर, झांज समीर प्रशांत चांदोरकर यांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसारीत होणारा हा प्रासंगिक कार्यक्रम
1143khz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्झ या एफ. एम. वाहिनीवर 27 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी इंद्रधनुष्य अंतर्गत प्रसारीत होणार असून हा कार्यक्रम आवर्जून ऐकण्याच आवाहन करण्यात येत आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.