Sunday, March 22, 2026

Latest Posts

चिपळूण-संगमेश्वरच्या तरुणाईसाठी सुवर्णसंधी; सह्याद्रीच्या प्रयत्नांना यश; खरवतेत आकार घेत आहे क्रीडाविश्वाचा नवा केंद्रबिंदू

चिपळूण: चिपळूण-संगमेश्वरचे आमदार, कार्यसम्राट शेखर निकम तसेच सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या अथक प्रयत्नातून खरवते कृषी महाविद्यालयाच्या परिसरात आधुनिक क्रीडांगणाची उभारणी सुरू होत आहे.या उपक्रमामुळे चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील नवतरुण खेळाडू यांना खेळातील प्राविण्य सिद्ध करण्यासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे.

👉  *क्रीडांगणात उभारले जात आहे*

*अद्ययावत इंडोर स्टेडियम*

*आंतरराष्ट्रीय दर्जाचे ४ क्रिकेट विकेट्स व खेळाचे मैदान*

*आधुनिक बास्केटबॉल कोर्ट*

*सुव्यवस्थित व्हॉलीबॉल मैदान*

*बंदिस्त कबड्डी मैदान*

*सेमी ऑलिंपिक साईजचा जलतरण तलाव*

या सर्व सुविधा लवकरच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील तरुणाईला खेळाच्या क्षेत्रात नवे बळ, नवी संधी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळणार आहे.
*सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारामुळे खरवते गाव क्रीडाक्षेत्रातील नवा प्रेरणादायी केंद्रबिंदू ठरणार आहे.*

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.