रत्नागिरी: मानसिक आरोग्य क्षेत्रात १९९२ पासून कार्यरत असलेली आणि २०१९ पासून रत्नागिरी येथे आपली सेवा देणारी दि. बॅनयन संस्था, रत्नागिरी यांनी समता फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने शांतिनगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले.या उपक्रमाचा उद्देश मानसिक आरोग्य लाभार्थी आणि संस्थेतील कर्मचारी यांना सहज नेत्र तपासणी व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देणे हा होता. या शिबिराचा ५० हून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला. नेत्र , मोतीबिंदू तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती अशा विविध सेवा या शिबिरात देण्यात आल्या.
या उपक्रमात डाॅ. संदीप उगवेकर नेत्ररोग अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी आणि श्री. नितीश शेट्ये, आरोग्य अधिकारी, झोन रत्नागिरी–सिंधुदुर्ग, समता फाउंडेशन यांनी मोलाचे सहकार्य केले.या प्रसंगी दि. बॅनयन मधील श्रीमती अरुणा नारायण, प्रोग्राम लीड – सीएमएचआयडी, रत्नागिरी, श्रीमती ममता जाधव, एचआर व प्रशासकीय कार्यकारी – महाराष्ट्र, आणि सहकारी वर्ग श्रीमती मेघा अमोल पवार, श्रीमती कोमल मडव नर्स कोऑर्डिनेटर, श्रीमती रेश्मा पालकर आणि समता फाउंडेशन व जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे आरोग्यसेवा आणि सामुदायिक मानसिक आरोग्य सेवा समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत पोहोचतात.
दि. बॅनयन संस्था महाराष्ट्रात सर्वसमावेशक सामुदायिक मानसिक आरोग्य उपक्रम राबवत असून, गरजू व्यक्तींना दर्जेदार आरोग्य आणि सामाजिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.



