रत्नागिरी, दि. 28 : (जिमाका)- जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या नगरपरिषद क्षेत्रात आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रात निवडणूकीसाठी मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी क्रमांक सार्वसु-1125/प्र.क्र. 229/ जपकु (29) परक्राम्य संलेख अधिनियम 1881 (1881 चा 26) च्या कलम 25 मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39/1/68 जेयुडीएल-तीन दि. 8 मे 1968 अन्वये शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन उपसचिव हेमंत महाजन यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.*
सदर मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना आणि केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम बँका इत्यादींनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी लागू राहील.



