रत्नागिरी : गेल्या महिन्यात मिरकरवाडा येथील अनधिकृत अतिक्रमणे हटवताना रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याबद्दल शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कौतुक करत पोलीस विभागाचे आभार मानले.
वर्षानुवर्षे असलेल्या आणि दिवसागणिक वाढत जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवणे हे महत्वाचे काम होते. त्यासाठी मत्स्य व्यवसाय खात्याने नियोजनबद्ध काम केले. त्यातही सर्वात मोठे सहकार्य केले ते रत्नागिरी पोलिसांनी! जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि त्यांच्या पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवल्याने अतिक्रमण हटवण्याचे काम निर्धोक आणि जलद गतीने झाले. त्याबद्दल आज रत्नागिरीमध्ये प्रशासकीय बैठकी दरम्यान मी त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले, आशा शब्दात ना. राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून वक्तव्य केलेच. तर जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांचे प्रत्यक्ष आभार मानताना खात्यातर्फे आभार सुद्धा व्यक्त केले.