चिपळूण: चिपळूण पोलीस ठाणे हद्दीमध्ये नागालँड व मणीपुर येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी छात्रावासात राहतात. या नागालँड व मणीपुर येथील विद्यार्थिनींनी 09/08/2025 रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथे “रक्षाबंधन” निमित्त पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांना व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी, उप विभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण श्री. राजेंद्रकूमार राजमाने, पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे, चिपळूण पोलीस ठाणे तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राख्या बांधल्या तसेच मराठीतील “गणेश बाप्पा आगमन गीत”मराठीत गाऊन दाखविले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.










