रत्नागिरी : भारताचा ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पोलीस परेड ग्राऊंड येथे उद्या (२६ जानेवारी) सकाळी ठीक ९.१५ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाखात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळ्याची तयारी पोलीस परेड मैदानावर पूर्णत्वास झालेली बघताना लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि या ठिकाणी अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने होते.



