रत्नागिरी दि. १८ :- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. डॉ उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाने रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील महिलावर्गाची वसुबारस निमित्त होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना महिला उपशहर प्रमुख पूजा दीपक पवार यांनी ‘बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप’ येथे आयोजित केलेल्या गाय-वासरू पूजनाला प्रभागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय संस्कृतीत गाय आणि वासरू यांचे महत्त्व अनमोल आहे, आणि वसुबारसेला या दोघांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, शहरी भागात अनेक महिलांना पूजेसाठी गाय आणि वासरू उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या. याच समस्येची दखल घेत, शिवसेना महिला उपशहर प्रमुख सौ. पूजा दीपक पवार यांनी महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.
मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला. ‘बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर’ येथे पूजनाची योग्य आणि सुरक्षित व्यवस्था केल्यामुळे प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मधील तसेच परिसरातील तमाम नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. सौ. पूजा दीपक पवार यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाला प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील महिलावर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



