Monday, March 23, 2026

Latest Posts

प्रभाग १३ मधून आफ्रिन होडेकर आणि सुहेल साखरकर यांचे पारडे जड

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ च्या उमेदवार आफरीन उबेद होडेकर यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील घरोघरी भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला नागरिकांतून विशेष प्रतिसाद लाभत आहे.
स्थानिक पातळीवर वेळोवेळी काम करणारे, अडीअडचणीत लोकांना मदत करण्यासाठी तत्पर राहणारी आणि सदैव संपर्कात असणाऱ्या  आफरीन उबेद होडेकर यांची प्रभागात आधीच ओळख आहे. त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही मिरकरवाडा येथे सभा घेत मिरकरवाड्याचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले आहे. नगराध्यक्षपदाच्या महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी मिरकरवाडा परिसरात लहान मुलांसाठी उद्यान उभारण्याची ग्वाही दिली आहे.
प्रभाग १३ मधून महायुतीचे उमेदवार आफरीन उबेद होडेकर व सुहेल साखरकर यांना नागरिकांतून चांगला प्रतिसाद लाभत आहे. सुहेल माजी नगरसेवक असून आफरीन मात्र नव उमेदवार आहेत. मात्र दोघांनीही नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना महायुतीतर्फे समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.