Monday, March 23, 2026

Latest Posts

प्रभागाच्या विकासाचा नवा संकल्प प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांना आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला  विनम्र आवाहन

आपल्या प्रभागाचे भवितव्य सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासाठी आणि विकासाची गंगा खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी, नगरपालिकेच्या सभागृहात आपला एक सच्चा, निष्ठावंत आणि कर्तृत्ववान ‘आवाज’ असणे, ही काळाची गरज आहे. आज, आपल्याच मातीतील एक असा तरुण… ज्याने शून्यातून स्वकर्तृत्वाचे उत्तुंग विश्व उभारले* … ज्याच्या स्वभावात नम्रतेचा ओलावा आणि परोपकाराचा सुगंध आहे… ज्याने आपल्या सेवाकार्याने जनमानसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे… असा *आपला सौरभ मलुष्टे* , उद्या एका *नव्या पर्वाचा शुभारंभ* करत आहे.

नगरसेवक पदाच्या या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात, आपल्या सर्वांच्या वतीने पहिले पाऊल ठेवण्याचा हा ‘मंगल क्षण’ *उद्या सकाळी १० वाजता* उदयास येत आहे.

हा केवळ एक उमेदवारी अर्ज नसेल, तर हा आपल्या *प्रभागाच्या उज्ज्वल भविष्याचा ‘संकल्प’ असेल.*

*एका प्रामाणिक आणि सुशिक्षित तरुणाच्या* या विजयी वाटचालीचे पहिले साक्षीदार होण्यासाठी, त्याच्या कर्तृत्वाला शुभआशीर्वाद देण्यासाठी आणि त्याच्या पाठीशी ‘आपण सारे एक आहोत’ हे नैतिक बळ देण्यासाठी, *आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे.* *तेव्हा, चला! आपल्या ‘सौरभ’च्या या प्रवासाला एकजुटीने बळ देऊया.

*दिनांक: १५ नोव्हेंबर (उद्या) वेळ: सकाळी ठीक १० वाजता*

आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपला नम्र, हेमंत वणजु संपादक

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.