रत्नागिरी, दि.8 (जिमाका): भगवती बंदर येथील महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या मालकीच्या 17 आंब्यांच्या कलमी झाडांचे लिलाव दि.12 जानेवारी रोजी बंदर निरीक्षक कार्यालय, महाराष्ट्र सागरी मंडळ मांडवी जेट्टीजवळ आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी लिलावात भाग घेण्यासाठी व लिलावाच्या अटी व शर्ती व झाडांचे ठिकाण या बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बंदर निरीक्षक कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ यांनी केले आहे.



