Saturday, March 28, 2026

Latest Posts

भारतीय जनता पार्टी निलेश महादेव आखाडे पुरस्कृत गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी निलेश महादेव आखाडे रत्नागिरी शहर सरचिटणीस आयोजित ऑनलाइन गणेशोत्सव सजावट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून साधारणपणे 27 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव रत्नागिरी मध्ये देखील मोठी धामदूम या उत्सवानिमित्त पाहायला मिळते कोकणवासी गावी अतिशय आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करण्यासाठी येत असतात. या उत्साहात अधिक भर पडावी बाप्पासाठी अधिक आवडीने सजावट करावी या उद्देशाने आखाडे यांनी या स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक ६ व ७ साठी केले होते.
         या स्पर्धेमध्ये अंकिता संजय कर्लेकर; कर्लेकर वाडी मारुती मंदिर रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आपल्या घरातील संपूर्ण दोन खोल्या कागदाचा वापर करून बाप्पासाठी सजावट केल्या होत्या. श्रीकृष्ण रूपातील गणपती बाप्पा व तयार करण्यात आलेली गुहा. सुंदर मेळ या इकोफ्रेंडली  सजावटीत पाहायला मिळाला. श्रेयस मयेकर गौरीश अपार्टमेंट पॉवर हाऊस नाचणे रत्नागिरी यांनी या स्पर्धेमध्ये विठ्ठल रूपातील गणेश मूर्ती संत गोरा कुंभार याची विठ्ठल भक्ती या थीम सह सजावट केली होती. संपूर्ण सजावट ही इको फ्रेंडली होती या स्पर्धेत श्रेयस मयेकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. प्रतापगड जागतिक वारसा असलेले स्थळ म्हणून शासनाने जाहीर केले याच विषयावर आधारित नाचणे पावर हाऊस येथील प्रा. सचिन टेकाळे यांनी आपल्या कौशल्यातून इको फ्रेंडली सजावट केली होती या स्पर्धेत प्रा. टेकाळे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
            या स्पर्धेस मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता या स्पर्धेत चार उत्तेजनार्थ क्रमांक देखील काढण्यात आले. प्रथम उत्तेजनार्थ अँड. विजय प्रकाश पेडणेकर विश्वनगर, उत्तेजनार्थ द्वितीय गुरुप्रसाद फाटक हिंदू कॉलनी, उत्तेजनार्थ विश्वेश सुरेश भिडे चैतन्य नगर रत्नागिरी, उत्तेजनार्थ श्री सुरेश दत्ताराम फटकरे राजेंद्र नगर रत्नागिरी यांनी मिळाविला.
            खेळीमेच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली यशस्वी क्रमांक प्राप्त गणेश भक्तांना अनुक्रमे सन्मानचिन्ह व प्रथम क्रमांक ३,३३३ द्वितीय क्रमांक २,२२२ तृतीय क्रमांक १,१११ उत्तेजनार्थ ५०१ रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन सर्व यशस्वी गणेश भक्तांना गौरविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, शहर सरचिटणीस संदीप सुर्वे,उमेश देसाई ,प्रज्ञा टाकले,  मनोज कोळवणकर,श्री. भिंगार्डे , प्रवीण रूमडे आदी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.