Sunday, March 22, 2026

Latest Posts

महिलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम करा : जयश्री गायकवाड

इनरव्हील क्लबच्या फूड फेस्टिव्हलला प्रारंभ

रत्नागिरी : इनरव्हील क्लबने महिला उद्योजकांसाठी आयोजित केलेला फेस्टिव्हल हा स्तुत्य उपक्रम आहे. त्याचबरोबर या क्लबने महिला आणि मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजनही करावे. सध्या महिला-मुलींवर होणारे अत्याचार पाहता महिलांनी आपल्याबरोबरच आपल्या मुलींनाही स्वसंरक्षण करण्यासाठी सक्षम करावे, असे आवाहन रत्नागिरीच्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
येथील जयेश मंगल कार्यालयात शुक्रवारी सकाळी इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या उत्तरायण २०२५ फूड फेस्टिव्हल आणि शॉपिंग कार्निव्हलचे उद्घाटन अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते झाले. पत्रकार शोभना कांबळे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. सोनाली कदम, ॲड. प्रिया लोवलेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पाहुण्यांनीही महिलांच्या मेहनतीचे कौतुक करून सर्व स्टॉलधारकांना शुभेच्छा दिल्या.

गायकवाड यांनी महिलांसाठी उद्योजकता आणि स्वावलंबन यांचे महत्त्व विशद केले. सर्व उद्योजक महिला आणि इनरव्हील क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या तीन दिवसांच्या या फेस्टिव्हलला रत्नागिरीकर नक्कीच प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्लबचे अध्यक्ष डॉ. स्वप्ना संदीप करे यांनी क्लबच्या वाटचालीची माहिती दिली.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे मिडटाऊनचे प्रेसिडेंट हिराकांत साळवी, डॉ. संदीप करे, बिपिनचंद्र गांधी, वामन सावंत, राजेंद्र कदम, केदार माणगावकर यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने सीनियर रोटेरियन धरमसी चाैहान, प्रेसिडेंट रुपेश पेडणेकर, नीलेश मुळ्ये, श्रीकांत भुर्के, मकरंद भुर्के मिलिंद भुर्के यांनी शुभेच्छा देऊन गौरवोद्गार काढले.

सूत्रसंचालन रिया गांधी आणि सोनाली आयरे यांनी केले. कार्यक्रमाचे चेअरमन तन्वी साळुंखे आणि डॉ. प्रियांका कांबळे यांनी सायंकाळी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.